सावंतवाडीत’सारीका ब्युटी पार्लर’चे ग्रँड ओपनिंग! ; सकल मराठा समाजाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ संपादक सीताराम गावडे व सौ संयुक्ता गावडे यांच्या हस्ते झाले पार्लरचे उद्घाटन.

सावंतवाडी :  द्वारकानगरी, बिरोडकर टेंब येथे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर “सारीका ब्युटी पार्लर”चे रविवारी संध्याकाळी उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन संपन्न झाले. या पार्लरचे उद्घाटन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम गावडे व सौ. संयुक्ता गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेविका साक्षी कुडतरकर, संतोष ठोंबरे, मनीषा गावडे, सायली राणे, सौ. संपदा परब तसेच वाड्यातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
नवीन सुरू करण्यात आलेल्या “सारीका ब्युटी पार्लर”मध्ये महिलांसाठी अत्याधुनिक व दर्जेदार सौंदर्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये—फेशियल व स्किन ट्रीटमेंट,ब्रायडल मेकअप व पार्टी मेकअप,हेअर कटिंग, हेअर स्पा व हेअर स्टायलिंग,आयब्रो, थ्रेडिंग व वॅक्सिंग,मेहंदी डिझाईन,नेल आर्ट व मॅनिक्युअर-पेडिक्युअर,अशा विविध सेवा एकाच छताखाली मिळणार आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व अनुभवी स्टाफ यांच्या माध्यमातून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याचा पार्लरचा मानस आहे.उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी “सारीका ब्युटी पार्लर”च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, महिलांसाठी अशा सुविधा शहरी भागातील एका प्रभागामध्ये उपलब्ध होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या नव्या उपक्रमामुळे परिसरातील महिलांना आता सौंदर्य सेवा घेण्यासाठी बाजार पेठेत जावे लागणार नाही, तर स्थानिक स्तरावरच दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles