सर्वोदय नगरच्या रहिवाशांचा संताप उसळला! ; एमएनजीएल अधिकाऱ्यांना नागरिकांचा कडक इशारा! 

सावंतवाडी : गेल्या काही महिन्यांपासून एमएनजीएल गॅस कनेक्शन कंपनीच्या कामामुळे सावंतवाडीतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, सर्वोदय नगरमधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यांवर साचलेली माती, खड्डे आणि धूळ यामुळे वाहनधारक व पादचारी अक्षरशः त्रस्त झाले आहेत. रोजचा प्रवास म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे.
या गंभीर परिस्थितीचा संताप अखेर उफाळून आला आणि सर्वोदय नगरमधील नागरिकांनी थेट एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत जोरदार धारेवर धरले. “काम करा पण नागरिकांचा जीव धोक्यात घालू नका,” असा स्पष्ट आणि ठाम इशारा देत रहिवाशांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः घेराव घातला.
रस्त्यांवरील मातीचे ढिगारे तात्काळ हटवून, रोलर फिरवून रस्ते सपाट करण्याची ठाम मागणी नागरिकांनी केली. वाढत्या दबावामुळे अखेर एमएनजीएलचे पदाधिकारी आनंद परब यांनी येत्या चार दिवसांत संपूर्ण रस्त्यांचे साफसफाई व सपाटीकरण पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

नागरिकांचा रोष का वाढला?
सतत चालणारी खोदकामे, अपूर्ण कामे आणि त्यानंतर दुर्लक्ष—यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. धूळमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, अपघाताचा धोका देखील वाढला आहे. प्रशासन व कंपनी यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात आली.
या वेळी सर्वोदय नगर रहिवासी संघाचे अध्यक्ष सुनील राऊळ, सेक्रेटरी मेघना राऊळ, उपाध्यक्ष अजय गोंदावळे, खजिनदार विद्याधर तावडे, विनायक चव्हाण गुरुदास कामत यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला संघाच्या अध्यक्षा दिशा कामत व सेक्रेटरी शरयू बारदेसकर, तसेच बिट्टू सुकी, , सौं. शिंत्रे , सौ. पिळणकर, शीतल पाटील, सिद्धेश नेरुरकर, कविता नाईक, श्री. नार्वेकर, सौ . रोशनी गावडे,, विजयकुमार मुरगुड, श्री. शेख, श्री परब, शीतल पारधी, भाऊ भिसे , अमृता साटेलकर यांच्यासह येथील नागरिकांचा सक्रिय सहभाग होता.
तसेच नगरसेवक अजय गोंदावळे आणि नगरसेविका नीलम नाईक यांनीही उपस्थित राहून नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला.

अंतिम इशारा!
“चार दिवसांत काम पूर्ण झाले नाही, तर आंदोलन तीव्र केले जाईल,” असा थेट इशारा नागरिकांनी दिला असून, आता एमएनजीएल प्रशासन आपले आश्वासन पाळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles