वैभवचा शतकासह धमाका! ; युवा फलंदाजाचे २ वर्ल्ड रेकॉर्डसह एकूण ५ विक्रम.

जयपूर : राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशी याने 25 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 103 धावांची खेळी केली. वैभवने या शतकी खेळीसह ऐतिहासिक कामगिरी केली. वैभवने या खेळीत 12 षटकार आणि 5 चौकार लगावले. वैभवने या दरम्यान 2 वर्ल्ड रेकॉर्ड्ससह एकूण 5 विक्रम केले. वैभवने या खेळीतील 12 षटकारांसह इतिहास घडवला. वैभव आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार लगावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

तसेच वैभवने प्रफुल हिंगे याला डावातील पहिल्याच षटकात 4 सिक्स ठोकले. वैभव यासह इनिंगमधील पहिल्याच ओव्हरमध्ये 4 सिक्स लगावणारा पहिला फलंदाज ठरला. (Photo Credit : Bcci)

वैभव आयपीएल स्पर्धेत षटकारांचं वेगवान अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. वैभवने अवघ्या 15 व्या डावात 50 षटकार पूर्ण केले. वैभव टी 20 क्रिकेटमध्ये चेंडूंबाबत वेगवान 1 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. वैभवने 473 बॉलमध्ये ही कामगिरी करुन दाखवली.

वैभवने या खेळीदरम्यान अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं. वैभवची या मोसमात 15 चेंडूत अर्धशतक करण्याची ही तिसरी वेळ ठरली. वैभव यासह एकूण 3 वेळा 15 चेंडूत अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला.

तसेच वैभवने प्रफुल हिंगे याला डावातील पहिल्याच षटकात 4 सिक्स ठोकले. वैभव यासह इनिंगमधील पहिल्याच ओव्हरमध्ये 4 सिक्स लगावणारा पहिला फलंदाज ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles