सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दुसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
या सोहळ्यास शाळेच्या अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले. कर्नल रत्नेश सिन्हा, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई तसेच उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान दोन्ही इयत्तांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत समाधान व आनंद व्यक्त केला.
ले. कर्नल रत्नेश सिन्हा आणि उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्ग उपस्थित होता.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नेहा म्हाडेश्वर यांनी केले.



