‘RPD’ हायस्कूलच्या दणदणीत निकालाची परंपरा कायम, SSC परीक्षेत ९९.२०% यश! ; १२५ पैकी १२४ विद्यार्थी उत्तीर्ण. ; ८ विद्यार्थ्यांनी मिळवले ९० टक्क्यांहून अधिक गुण.

सावंतवाडी : शहरातील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत ९९.२० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील एकूण १२५ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मेहनत, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर RPD हायस्कूलने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.

🎖️ गुणवंत विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
🥇 प्रथम क्रमांक : कु. जोशी योगेश विवेकानंद – 494/500 (98.80%)
🥈 द्वितीय क्रमांक : राऊळ दिनेश कृष्णा – 487/500 (97.40%)
🥉 तृतीय क्रमांक : कु. तेरेदेसाई अद्विता प्रसाद – 479/500 (95.80%)
🏅 चौथा क्रमांक : कु. परब आयुष प्रचिमोण – 474/500 (94.80%)
🏅 पाचवा क्रमांक : कु. गावडे वैष्णवी कृष्णा – 461/500 (92.20%)
🏅 सहावा क्रमांक : कु. सांगेलकर भैरवी प्रसाद – 460/500 (92.00%)
🏅 सातवा क्रमांक : कु. वर्गीकर नक्षत्रा गोविंद – 459/500 (91.80%)
🏅 आठवा क्रमांक : कृ. बांदेकर रुची – 448/500 (89.60%)
🏅 नववा क्रमांक : कु. सातवळेकर रामचंद्र जयंत – 441/500 (88.20%)
🏅 दहावा क्रमांक : ku. नाईक ऋतुजा नरेंद्र – 440/500 (88.00%)
🏅 अकरावा क्रमांक : कु. राऊळ नंदिनी संजय – 438/500 (87.60%)
🏅 बारावा क्रमांक : कु. कुबल शुभंकर संजय – 436/500 (87.20%)
🏅 तेरावा क्रमांक : कु. राणे तनिष्का अजित – 434/500 (86.80%)
🏅 तेरावा क्रमांक : कु. परब आर्या रणजित – 434/500 (86.80%)
🏅 चौदावा क्रमांक : कु. दळवी पार्थ प्रवीण – 431/500 (86.20%)
🏅 पंधरावा क्रमांक : कु. परव रामचंद्र विजय – 429/500 (85.80%)
🎉 या अभूतपूर्व निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles