आंबोलीत उद्या १२ मे रोजी भव्य हिंदू संमेलन! ; शोभायात्रा, व्याख्याने आणि सामूहिक भोजनाचे आयोजन.

सावंतवाडी :  आंबोली, चौकुळ आणि गेळे येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू समाजाच्या ऐक्य, संघटन आणि संस्कृती संवर्धनाच्या उद्देशाने आंबोली येथे उद्या १२ मे रोजी भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे संमेलन कोणत्याही राजकीय पक्ष, संघटना किंवा व्यक्तीच्या माध्यमातून नव्हे, तर सकल हिंदू समाजाच्या एकत्रित सहभागातून आयोजित करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


या संमेलनानिमित्त १२ मे रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत श्रीराम मंदिर ते श्री देवी माऊली मंदिर दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत ढोल पथक, भगवे ध्वज, प्रभू श्रीरामांचा रथ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तसेच भारतमातेचा रथ आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व हिंदू बांधव पारंपरिक वेशभूषेत सहकुटुंब सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
शोभायात्रेसाठी सहभागी होणाऱ्यांनी सायंकाळी ३.३० वाजता श्रीराम मंदिर, बाजारवाडी आंबोली येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शोभायात्रेनंतर श्री देवी माऊली मंदिर येथे सायंकाळी ६ वाजता भव्य हिंदू संमेलन होणार आहे. या संमेलनात भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ. पंकज दिघे यांचे हिंदू धर्म, संस्कृती संवर्धन आणि पंच परिवर्तन या विषयावर व्याख्यान होणार आहे. आंबोलीची सुपुत्री ह.भ.प. सायलीताई महाराज गावडे यांचेही विशेष मार्गदर्शन या संमेलनात लाभणार आहे.
संमेलनानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून आंबोली, गेळे, चौकुळ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज आंबोली-चौकुळ-गेळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles