कलंबिस्त येथे घरातच आढळला वृद्धाचा मृतदेह.

सावंतवाडी : कलंबिस्त घनशेळवाडी येथील प्रकाश बाळकृष्ण मेस्त्री (वय ७२) हे आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेस्त्री हे घरात एकटेच राहत होते. त्यांची मुले कामानिमित्त गोवा व मुंबई येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी सकाळपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. तसेच वारंवार हाक मारूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला.
यानंतर पोलीस पाटील तसेच शेजारी मंडळी यांनी मिळून घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता प्रकाश मेस्त्री हे बेडवर मृतावस्थेत आढळून आले. याबाबतची खबर शत्रुघ्न बाबाजी मिस्त्री यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.
ही घटना १२ मे रोजी सकाळी ६ ते रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles