मळेवाड येथे दाखल्यांकरिता विशेष शिबीर. ; ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम, नागरिकांमधून समाधान.

सावंतवाडी : विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक असणारे उत्पन्न दाखला करिता ग्रामपंचायत मुळेवाड कोंडुरे कडून शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते याचा शुभारंभ सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लागला असून आता विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेसाठी लगबग सुरू झाली आहे या प्रवेश प्रक्रिया करिता लागणारा एक वर्ष व तीन वर्ष उत्पन्न दाखला हा गरजेचा असल्याने ग्रामपंचायत मुळेवाड कोंडूरेकडून गावातील विद्यार्थ्यांकरिता दाखला आपल्या दारी शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते. याचा शुभारंभ सरपंच मिलन पार्सेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. गावातील विद्यार्थ्यांना सावंतवाडी तहसीलदार किंवा अन्य खाजगी आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये जाऊन ये-जा करावी लागू नये तसेच आर्थिक व वेळेचा अपव्यय होऊ नये व दाखले तात्काळ वेळेत मिळावेत, यासाठी गावात ग्रामपंचायतमार्फत गावातील विद्यार्थ्यांकरिता सदर शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सांगितले. या शिबिराकरता सावंतवाडी सेतू सुविधा केंद्रातील संजय व मळेवाड तलाठी अनुजा भास्कर यांचे विशेष सहकार्य लाभले सदस्य शिबिर सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles