धक्कादायक – बड्या नेत्याचं बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य! ; शरीरावर जखमा अन्…

लुधियाना: देशाच्या कोणत्याच भागात आज मुली सुरक्षित नाहीत. शाळेत, बाहेर, क्लासमध्ये, नातेवाईकांकडे एवढंच नाही तर, घरात देखील मुली सुरक्षित नाहीत. आता तर एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. बड्या नेत्यानेच बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थिनीसोबत घाणेरडं कृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थिनीने विरोध केल्यानंतर देखील गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाय मुलीला गुंडांकडून धमकी देखील देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी लुधियाना येथील रहिवासी आणि अकाली दल नेते जसकरणजीत सिंग देओल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबियांसोबत नेत्याची जुनी ओळख होती. फार पूर्वी पीडित मुलीचे कुटुंबिय आणि नेत्याची ओळख झालेली. पण या ओळखीची मुलीला मोठी किंमत मोजावी लागेल, असा वडिलांनी कधी विचार देखील केला नसेल. नेत्याने अनेकदा मुलीसोबत बळजबरी वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबाच्या संपर्कात आल्यानंतर नेत्याचे मुलीच्या आईसोबत चांगले संबंध जुळून आले. त्यानंतर 2023 मध्ये मुलीच्या आईने नवऱ्याचं घर सोडून नेत्यासोबत राहण्यास सुरुवात केली.

वडिलांकडून गंभीर आरोप –

वडिलांनी असे आरोप केले आहेत की, आरोपीने मुलीला डेहराडूनमधील तिच्या बोर्डिंग स्कूलमधून मोहालीतील एका हॉटेलमध्ये नेले, जिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जेव्हा मुलीने विरोध केला, तेव्हा आरोपीने, जर तिने कोणाला सांगितलं तर तिला आणि तिच्या आईला घरातून हाकलून देण्याची धमकी दिली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर त्याने त्या अल्पवयीन मुलीचा पुन्हा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यानंतर नेत्याने तिला मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची देखील दिली. तक्रारीत असं देखील सांगण्यात आलं आहे की, मुलीला कालव्यात फेकण्याची आणि गुंडांकडून मारण्याची देखील धमकी दिली होती. त्या प्रसंगानंतर मुलगी प्रचंड घाबरली होती. अखेर मुलीने घडलेली सर्व घटना वडिलांना सांगितली.

वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या शारीरावर अनेक जखमा होत्या. चौकशी केल्यानंतर मुलीने घडलेली सर्व घटना सांगितली. ज्यानंतर पोलिसांनी नेत्याविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस आता अधिक चौकशी करत आहे. पण घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles