चेन्नई : तामिळनाडूमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील घोडेबाजार आणि भ्रष्टाचार प्रकरणी CBI चौकशीची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत चौकशी पूर्ण होईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मदुराई येथील केके रमेश यांनी ही याचिका दाखल केली आहे. यामुळे विजय यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केके रमेश यांनी आरोप केला आहे की, अलीकडील विधानसभा निवडणुकांनंतर TVK ने घोडेबाजार करत इतर आमदारांचा पाठिंबा मिळवला. तसेच रमेश यांनी भाजपविरोधात CBI चौकशीची मागणी केली आहे. याचिकेत भारत सरकार, CBI आणि तामिळनाडू सरकारला पक्षकार करण्यात आले आहे. आता यावर सुनावणी पार पडल्यानंतर कोर्ट काय निर्णय देते ह पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विजय यांनी घेतली आहे मुख्यमंत्रीपदाची शपथ –
तमिळनाडूमध्ये TVK हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र, सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमत त्यांच्याकडे नव्हते. या विधानसभा निवडणुकीत TVK ने 108 जागा जिंकल्या होत्या. TVK पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला. त्यानंतर काँग्रेस, CPI, CPM आणि IUML यांनी विजय यांच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर विजय यांनी 10 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि विधानसभा सभागृहात बहुमत सिद्ध केले.



