‘त्या’ संशयित एस.टी. चालकाची अपघात प्रकरणी निर्दोष मुक्तता. – ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांचा यशस्वी युक्तिवाद.

  • सावंतवाडी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल.

सावंतवाडी : सन २०१९ साली गाव मौजे शेर्ले-बाबरवाडी येथे घडलेल्या भीषण अपघात प्रकरणात दोन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या एस.टी. चालकाची सावंतवाडी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल ७ वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला.

या प्रकरणातील संशयित चालक सुनील अशोक धुरी याच्यावर निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने एस.टी. बस चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप होता. या अपघातात दुचाकीस्वार महेश श्री. भगत आणि मागे बसलेले उमेश द. कोरगावकर यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर चालकाविरोधात भारतीय दंड विधान कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटना १९ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सावंतवाडी ते शेर्ले मार्गावर घडली होती. अपघातानंतर या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती. मात्र सुनावणीदरम्यान साक्षीदारांच्या जबाबांतील विसंगती, तसेच आरोपी चालकाविरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यात आले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

संशयित चालकाच्या बाजूने ॲड. सिद्धार्थ माधव भांबुरे आणि नोटरी यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीचा या अपघाताशी थेट संबंध नसल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडला. सर्व पुरावे आणि साक्षींचा बारकाईने विचार केल्यानंतर न्यायालयाने संशयित चालक सुनील अशोक धुरी याची निर्दोष मुक्तता केली.

या निकालामुळे दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे गेलेल्या चालकाला मोठा दिलासा मिळाला असून, हा निकाल परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles