अभिमानास्पद! – मानसी परब – राणे यांची श्रम कामगार संघटना, महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षपदी निवड.

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे कार्यरत असलेल्या सौ. मानसी परब – राणे यांची श्रम कामगार संघटना, महाराष्ट्र यांच्या महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कामगार संघटनांमध्ये महिलांचा वाढता सहभाग आणि नेतृत्व अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने संघटनेने ही निवड जाहीर केली आहे. कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मानसी राणे यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
“महिला शक्ती हीच संघटनेची प्रगती” हा संदेश देत संघटनेने त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. कामगार, श्रमिक महिला, बांधकाम कामगार, वाहतूक क्षेत्रातील कर्मचारी तसेच असंघटित कामगारांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या निवडीबद्दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नवनाथ मोडक तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बी. एन. खरात यांनी मानसी राणे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कामगारांच्या हक्कांसाठी संघटित होण्याचे आवाहन करत “संघटित होऊया… हक्क मिळवूया… प्रगती साधूया!” हा संदेशही संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles