✍️ शशिकांत मोरे.
रोहा : शहरात उत्पादन शुल्क खात्याच्या कारवाईत जमा केलेली चारचाकी वाहने काल रात्रीच्या वेळी एका अज्ञात इसमाने जेसीबीद्वारे रस्त्यावरून विरुद्ध बाजूला ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रस्त्यावर उभी असलेली ही चारचाकी वाहने जेसीबीद्वारे कुणी ढकलल्या? याचा शोध संबंधित विभाग घेत असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
रोहे शहरात मध्यवर्ती असलेल्या रायकर पार्क या ठिकाणी उत्पादन शुल्क दारू बंदी विभागाचे कार्यालय आहे.या विभागाने दारूच्या गुन्ह्यातील वापरलेल्या सुस्थितीत असलेली चारचाकी वाहने जप्त केली आहेत. सदर वाहने कार्यालयाच्या शेजारी रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती मात्र काल रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने जेसीबी लावून ही वाहने रस्त्यावरून ढकलून देण्यात आल्याची माहिती समजत आहे.या वाहनांपैकी मारुती वॅगनार एम एच ०१ ए.एल ६३७९, मारुती वॅगनार एम एच ०६ ए एन ८८०५,एम एच ०२ बीजी ४३७३ आणि एक मारुती ८०० अशी वाहनांचे नंबर आहेत.नसदर वाहने या रस्त्याच्या कडेला लावण्यात आली होत्ती.त्या वाहनांची या रोडवर रहदारी नसल्याने तशी अडचणही नव्हती.जर का कुणाला अडचण असती तर त्यांनी संबंधित कळविले गेले पाहिजे होते.नगरपालिकेने सुद्धा संबंधित विभागाला वाहने हलवा असे कधी कळवले नाही. असे असतानाही अचानक ही वाहने अक्षरशः जेसीबीद्वारे ढकलण्या मागचे कारण तरी काय?, असा प्रश्न येथील अधिकाऱ्यांना पडला आहे.

सदर वाहने या दारूच्या गुन्ह्यात वापरले आहेत.पाच सहा महिन्यापूर्वीच ही वाहने या ठिकाणी उभी केली होती.मात्र काल अचानक हा प्रकार केल्यामुळे वाहनांचे खूप नुकसान झाले आहे.त्यामुळे उद्या न्यायालयाच्या आदेशाने वाहने जर का सोडवली गेली तर वाहनाचे झालेले नुकसान भरपाई कोण देणार?असाही प्रश्न संबंधित विभागाला पडला आहे.सदर वाहने ही रोह्यातीलच एका तरुण राजकारणी व्यक्तीने ढकलून दिल्याची रोहे शहरात चांगलीच चर्चा आहे.या व्यक्तीला आपण एका शासकीय खात्याच्या ताब्यात असलेल्या गाड्या ढकलून देत आहोत याचं काहीच कसं समजलं नाही असाही प्रश्न समोर येत आहे.सरकार नियम कायदा या गृहस्थाला माहित आहे की नाही.?की आमचं कोण वाकड करणार नाही सत्तेची नशा, हुकूमशाही,भाईगिरीचे बळ असाच प्रकार असल्याचे निदर्शनात येत आहे.दारू उत्पादन शुल्क विभागाने यातील आरोपीचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिक वर्गातून होत आहे.
रस्त्यावरील कारवाई दरम्यान उभ्या वाहनाना जेसीबीद्वारे रस्त्यावरून कोणी ढकलल्या?याचा शोध घेऊन कारवाई मात्र करणार असल्याचे उत्पादन शुल्क सहाय्यक दुय्यम निरीक्षक महाड विभाग रोहा कार्यालयाच्या अपर्णा पोकळे यांनी सांगितले.



