सावंतवाडी : आर्थिक क्षेत्रात विश्वासार्ह कामगिरी करत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात आपला ठसा उमटवणाऱ्या साईनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या नव्या सावंतवाडी शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा रविवारी, ३१ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे.
संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्रामदैवत श्री देव उपरलकर, श्री देव पाटेकर, श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या आशीर्वादाने तसेच सभासद, ठेवीदार, पीग्मी खातेदार, कर्मचारी, हितचिंतक आणि नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर सावंतवाडी शाखेची स्थापना करण्यात आली आहे.
या निमित्ताने शाखेमध्ये श्री सत्यनारायण महापूजा तसेच उद्घाटनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व सभासद, ग्राहक आणि नागरिकांनी उपस्थित राहून पूजनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सावंतवाडी शहरातील सृष्टी एम्पोरिया, बाजारपेठ, फिश मार्केटजवळ या ठिकाणी शाखा कार्यरत होणार असून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी नागरिकांनी सहकार्य व शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक-अध्यक्ष श्री. उत्तम आनंदा जाधव यांनी केले आहे.
संस्थेने आपल्या सभासदांच्या सहकार्याने तब्बल २२८ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला असून सावंतवाडी शाखेच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत बँकिंग आणि आर्थिक सेवा पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला आहे.
कार्यक्रम तपशील : 📅 दिनांक : रविवार, ३१ मे २०२६
🕥 वेळ : सकाळी १०.३० वाजता
📍 स्थळ : सृष्टी एम्पोरिया, बाजारपेठ, फिश मार्केटजवळ, सावंतवाडी
📞 संपर्क : ९१६८६६०५७६
“आपले ऋणानुबंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी आग्रही निमंत्रण!” अशी भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.



