‘Best from Waste’ स्पर्धेत कुणकेरीच्या निता सावंत अव्वल.

सावंतवाडी : विनायक पर्यटन सहकारी संस्था, सावंतवाडी यांच्या वतीने सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या ‘टाकाऊतून टिकाऊ’ (Best from Waste) स्पर्धेत कुणकेरी नं. ३ शाळेच्या शिक्षिका श्रीमती निता नितीन सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
पर्यावरणपूरक दृष्टिकोनाला चालना देतानाच नागरिकांमधील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमास सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, उद्योजक सुरेश गवस, एसपीके कॉलेजचे प्राध्यापक सुधीर बुवा, मीलाग्रीज हायस्कूलच्या सेवानिवृत्त पर्यवेक्षिका मेघना राऊळ, प्रकाश राऊळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव राजेंद्र बिर्जे तसेच संवाद मीडिया प्रतिनिधी विद्या बांदेकर उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण यशवंतराव भोसले महाविद्यालयाचे प्रा. पोपकर आणि बांदेकर आर्ट कॉलेजचे प्रा. अक्षय सावंत यांनी केले. जिल्हाभरातून तब्बल ३५ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यातून श्रीमती निता नितीन सावंत यांनी आपल्या कल्पकता, कलात्मकता आणि पर्यावरणपूरक संकल्पनेच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळविला.
निता सावंत या उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी विविध जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, आंतरराज्यीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून अनेक पारितोषिके मिळविली आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि कला क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles