दृष्टिबाधितांसाठी आज सावंतवाडीत गोलबॉल प्रशिक्षण शिबीर. ; गोलबॉलमधून घडणार नवे खेळाडू, साहस प्रतिष्ठानचा उपक्रम.

सावंतवाडी : दृष्टिबाधित व्यक्तींमध्ये क्रीडा क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने गोलबॉल क्रीडा प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दृष्टिबाधित खेळाडूंसाठी विशेष विकसित करण्यात आलेला गोलबॉल हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रीडा प्रकार असून या खेळामध्ये प्रगतीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या शिबिरासाठी शिवछत्रपती, राष्ट्रपती तथा संविधान योद्धा पुरस्कार सन्मानित आंतरराष्ट्रीय गोलबॉल खेळाडू व प्रशिक्षक मा. नेहाताई पावसकर या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हे शिबिर मंगळवार, दि. २ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत समाजमंदिराच्या बाजूच्या इमारतीमध्ये, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दृष्टिबाधित बांधव, विद्यार्थी, पालक तसेच इच्छुक खेळाडूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी रुपाली पाटील (मो. ९०४९२७१७४४) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles