युवासेनेत मोईन फिरोज खान यांना मोठी जबाबदारी! ; सावंतवाडी उपतालुकाप्रमुखपदी निवडीने बांद्यात उत्साहाचे वातावरण.

बांदा : शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेत सक्रियपणे कार्यरत असलेले धडाडीचे युवा कार्यकर्ते मोईन फिरोज खान यांची सावंतवाडी युवा सेना उपतालुकाप्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे बांदा परिसरासह युवा सेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी, युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या मोईन खान यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. निवडीचे अधिकृत पत्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब, युवा सेना तालुकाप्रमुख रियाज खान तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी मोईन खान यांच्यासह सैफान खान, कैफ शेख, हर्षल कल्याणकर, भावेश शेटकर, सतवीर शेखावत, दिव्यम सावंत आणि युवा सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडीनंतर बोलताना मोईन खान यांनी, “पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पण भावनेने काम करणार असून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” असा विश्वास व्यक्त केला.

विशेष म्हणजे, मोईन खान हे बांदा येथील सेवानिवृत्त प्राचार्य, शिक्षणक्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेले अन्वर खान यांचे नातू आहेत. अन्वर खान हे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून परिसरात परिचित आहेत. त्यामुळे मोईन खान यांच्या निवडीला राजकीय आणि सामाजिक वर्तुळातूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

“कर्तृत्वाची दखल, नेतृत्वाचा विश्वास; मोईन खान यांच्यावर युवा सेनेची महत्त्वाची धुरा”, अशा शब्दांत त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles