गोरगरिबांचा फक्त एकच नाथ, अस्मानी संकटात विशाल परब यांची खंबीर साथ! ; आजारी मुलासह मृत्यूच्या छायेत जगणाऱ्या ‘त्या’ विधवा मातेच्या मदतीला ‘माणुसकीचा विशाल हात’.

✍️ रुपेश पाटील.

सावंतवाडी : ”डोक्यावर छप्पर नाही… घरात कमावता हात नाही…
सोबत फक्त आजारपण, गरिबी आणि अंगावर येणारा मुसळधार पावसाळा…” अशा विदारक परिस्थितीत इन्सुली – पागावाडी येथील ६५ वर्षीय वृद्ध विधवा माता आणि तिचा गंभीर आजारी मुलगा अक्षरशः मृत्यूच्या छायेत जीवन जगत आहेत. मात्र, या हतबल कुटुंबाच्या वेदनेला प्रतिसाद देत भाजपचे युवा नेते विशाल परब हे देवदूतासारखे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत.

“यंदा घर पडेल अंगावर…” – माऊलीच्या डोळ्यात अश्रू, मनात मृत्यूची भीती
इन्सुली पागावाडी येथील श्रीमती जनाबाई धोंडू पाटील (वय ६५) या वृद्ध विधवा महिला आपल्या मुलासोबत अत्यंत मोडकळीस आलेल्या घरात राहत आहेत. घराचे छप्पर पूर्णपणे उडाले असून भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच घराचा एक भाग कोसळल्याने त्यांच्या भीतीत आणखी भर पडली आहे.

“यंदाचा पावसाळा कसा काढायचा…? घर अंगावर पडून आम्ही जिवंत गाडले जाऊ का…?”
असा आर्त सवाल करताना त्या माऊलीच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटत होता.
गरिबी, आजारपण आणि जगण्यासाठी सुरू असलेली जीवघेणी झुंज.  जनाबाईंचा मुलगा शाहू धोंडू पाटील हा घराचा एकमेव आधार. पण नियतीने त्याच्यावरही क्रूर घाव घातला आहे. शाहू हा गंभीर टी.बी. (क्षयरोग) आजाराने ग्रस्त असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
अंगात काम करण्याची ताकद नाही…
उपचारासाठी पैसे नाहीत…
राहायला सुरक्षित घर नाही…
अशा दुहेरी संकटात हे मायलेक पूर्णपणे कोलमडून गेले होते.

नितीन राऊळ यांनी दाखवली संवेदनशीलता अन् विशाल परब तात्काळ धावले मदतीला –
या कुटुंबाची भयावह परिस्थिती इन्सुलीचे जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या निदर्शनास आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ही माहिती भाजप युवा नेते विशाल परब यांच्यापर्यंत पोहोचवली.
माहिती मिळताच विशाल परब यांनी तातडीने या कुटुंबाच्या मदतीचा निर्णय घेत प्रत्यक्ष पुढाकार घेतला. त्यांच्या या तत्परतेमुळे निराशेच्या अंधारात जगणाऱ्या या कुटुंबाला आशेचा किरण दिसू लागला आहे.

“गोरगरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हेच आमचे कर्तव्य!” – विशाल परब
यावेळी बोलताना भाजप युवा नेते विशाल परब म्हणाले,
“पागावाडीतील या कुटुंबाची अवस्था पाहून मन सुन्न झाले. एका वृद्ध माऊलीला आणि तिच्या आजारी मुलाला पावसाळ्यात अशा अवस्थेत सोडणे माणुसकीला धरून नाही. त्यांना सुरक्षित छत मिळवून देण्यासाठी आणि उपचारासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू.”

‘गरिबांचा खरा नाथ’ म्हणून विशाल परब यांच्यावर कौतुकाचा वर्षाव!
विशाल परब यांनी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीतून या कुटुंबाला आधार दिल्याने इन्सुली परिसरातून त्यांच्या कार्याचे जोरदार कौतुक होत आहे. “गरिबांचा खरा नाथ”, “माणुसकी जपणारा नेता” अशा शब्दांत नागरिक त्यांच्याविषयी भावना व्यक्त करत आहेत.
त्यांच्या या मदतीमुळे आज त्या वृद्ध माऊलीच्या डोळ्यातील भीती कमी झाली असून, तिथे आता आशेचे आणि समाधानाचे अश्रू दिसू लागले आहेत.

माणुसकी अजून जिवंत असल्याची जाणीव करून देणारी घटना –
पावसाळा तोंडावर असताना सुरक्षित निवाऱ्याविना जगणाऱ्या एका वृद्ध मातेच्या आणि तिच्या गंभीर आजारी मुलाच्या मदतीला विशाल परब धावून येणे, ही केवळ मदत नसून खरी माणुसकी जपणारी कृती असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles