मुंबई :ओटीटीच्या प्रेक्षकांसाठी हा ऑगस्ट महिना खूप खास असणार आहे. ओटीटीवर ऑगस्टच्या या आठवड्यातही (5 ते 11 ऑगस्ट) प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर अॅक्शन, रोमँटिक, कॉमेडी अशा वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार आहे.
इंडियन 2
1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंडियन’ या चित्रपटाचा सिक्वेल इंडियन 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला. कमल हासन यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे.
फिर आयी हसीन दिलरुबा
2021 मध्ये रिलीज झालेल्या ‘हसीन दिलरुबा’ या रोमँटिक थ्रिलर चित्रपटाचा सिक्वेल ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ रिलीज होणार आहे. आधीच्या चित्रपटाची कथा जिथून संपली तिथून या चित्रपटाची कथा सुरू होणार आहे. चित्रपटात तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि सनी कौशल दिसणार आहेत. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
ग्यारह ग्यारह
‘ग्यारह ग्यारह’ ही एक फिक्शनल थ्रिलर वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचे कथानक 1990, 2001 आणि 2016 या कालावधीतील आहे. या वेब सीरिजमध्ये स राघव जुयाल, धैर्य करवा यांच्यासोबत कृतिका कामराचीदेखील भूमिका आहे. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर 9 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.
घुडचढी
पार्थ समथान, खुशाली कुमारी, संजय दत्त आणि रवीना टंडन यांचा रोमँटिक कॉमेडी ‘घुडचढी’ चित्रपट आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन बिनॉय गांधी यांनी केले आहे.
टर्बो
सुपरस्टार मामुटी यांचा चित्रपट ‘टर्बो’ ओटीटीवर रिलीज होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जवळपास 71 कोटींची कमाई केली. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी ‘सोनी लिव्ह’वर रिलीज होणार आहे.
लाइफ हिल गई
‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्ये मुन्ना भैयाची भूमिका साकारणारा अभिनेता दिव्येंदू आता कॉमेडी-ड्रामा वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. ‘लाइफ हिल गई’ ही वेब सीरिज 9 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर (Disney + Hotstar) प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये दिव्येंदू सोबत कुशा कपिला आणि कबीर बेदी झळकणार आहेत.