बालमन घडविणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा! ; ममता मसुरकर यांचा ‘सर्वोत्तम शैक्षणिक सेवा पुरस्कार २०२६’ ने गौरव!

ठाणे : शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम साधत भावी पिढी घडविण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या हॅप्पी हार्ट स्कूलच्या संचालिका तथा हॅप्पी हार्ट फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा सौ. ममता मसुरकर यांना ‘सर्वोत्तम शैक्षणिक सेवा पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व सन्मान सोहळा २०२६’मध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांसमवेत त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

बालसंस्कार, युवक विकास, व्यक्तिमत्त्व घडण आणि सामाजिक जाणीव जागृत करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबविलेले उपक्रम, शिक्षणासोबत मूल्यसंस्कारांची दिलेली जोड आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांचे कार्य विशेष ठळकपणे अधोरेखित झाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles