भोसले सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थी-पालकांसाठी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न.

सावंतवाडी : नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठी आयोजित परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी शाळेच्या शिस्तबद्ध, संस्कारमय आणि नेतृत्वकेंद्री शैक्षणिक वातावरणाची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.
कार्यक्रमाला भोसले नॉलेज सिटीच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शाळेचे कमांडंट लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा (निवृत्त), प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस तसेच डे बोर्डिंग विभागाच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात सोनाली शेट्टी यांनी सैनिक स्कूलमधील शिक्षण हे केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, स्वावलंबन आणि राष्ट्रप्रेम विकसित करणारी जीवनशैली असल्याचे प्रतिपादन केले.
प्रियांका देसाई यांनी सैनिक स्कूलला मान्यता मिळविण्याचा प्रवास आणि संस्थेच्या आगामी वाटचालीविषयी माहिती दिली. तर प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस यांनी नव्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन, शाळेचे नियम, विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पालकांसमोर मांडली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ले. कर्नल रत्नेश सिन्हा यांनी भोसले सैनिक स्कूल ही भावी नेतृत्व घडविणारी कार्यशाळा असल्याचे सांगितले, तर सुनेत्रा फाटक यांनी सैनिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचा समारोप प्राची कुडतरकर यांनी आभार प्रदर्शनाने झाला. नव्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना शाळेच्या कार्यपद्धतीची ओळख करून देत आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यात कार्यक्रम यशस्वी ठरला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles