सावंतवाडी : गोवंश व मांस वाहतूक प्रकरणातील सराईत आरोपी तसेच वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी सरफराज भाऊद्दीन ख्वाजा (रा. बाहेरचा वाडा, सावंतवाडी) याला सावंतवाडी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शिताफीने ताब्यात घेतले.
आज दुपारनंतर आरोपी आपल्या राहत्या घराजवळ आल्याची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत सावंतवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माधुरी मुळीक व प्रमोद पाटील यांनी तातडीने पथकासह परिसरात निगराणी सुरू केली.


दरम्यान, वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राठोड हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर आरोपी सरफराज ख्वाजा याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वेंगुर्ला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
या कारवाईत पोलीस हवालदार अमित राऊळ, मंगेश शिंगाडे, महेश निरवडेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल पवन परब आणि श्रीमती नाईक यांनी सहभाग घेतला. ही संपूर्ण कारवाई आज सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत यशस्वीरीत्या पार पडली.



