राज्यस्तरीय ड्रॉइंग ऑलिंपियाडमध्ये मिलाग्रीस हायस्कूलची चमक! ; किमया लोबो, हंसिका पाटीलचा डंका!

सावंतवाडी : मिलाग्रीस हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय ड्रॉइंग ऑलिंपियाड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

इयत्ता दहावी ‘डी’ मधील किमया पीटर लोबो हिने राज्यात चौथा क्रमांक पटकावत पदक, प्रमाणपत्र तसेच ₹१,००० ची शिष्यवृत्ती मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.

तसेच इयत्ता सहावी ‘बी’ मधील हंसिका राजेश पाटील हिने राज्यात अकरावा क्रमांक मिळवत पदक आणि प्रमाणपत्रावर आपले नाव कोरले.

या दोन्ही गुणवंत विद्यार्थिनींचा प्रशालेचे प्राचार्य फादर रिचर्ड सालढाणा यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या यशामुळे मिलाग्रीस हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांमधील कलागुणांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक आणि संस्थेच्या सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles