सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय ओरोस येथे झालेल्या 17 वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पांडुरंग संताजी पाटकर या विद्यार्थ्यांने मुलांच्या गटांत 33.50 मीटर थाळी फेकून जिल्ह्यात प्रथम आला. रत्नागिरी (डेरवण) येथे होणाऱ्या विभागीयस्तरावर त्याची निवड झाल्याबद्दल या यशप्राप्त विद्यार्थ्याचे व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक श्री. आर. के. राठोड यांचे नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ, संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या कल्पना बोवलेकर,सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.



