मसुरे येथे ८ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर साहस दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. ; वैशाली पंडित यांची प्रमुख वक्ता म्हणून उपस्थिती.

मालवण : तालुक्यातील, मसुरा एज्युकेशन सोसायटी, मुंबई आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आर. पी. बागवे हायस्कूल, मसुरे – मर्डेच्या सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा साहस दिन तथा मार्सेलिस पराक्रम स्मरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

८ जुलै १९१० रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी फ्रान्समधील मार्सेलिस बंदरात एस. एस. मोरिआ जहाजाच्या शौचालयाच्या खिडकीतून अथांग समुद्रात ऐतिहासिक उडी मारून अद्वितीय धैर्य, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्यप्रेमाचा अभूतपूर्व आदर्श जगासमोर ठेवला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या सुवर्णक्षणाचे स्मरण व्हावे आणि विद्यार्थ्यांना त्यातून राष्ट्रप्रेम, धैर्य व प्रेरणा मिळावी, या उद्देशाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून मालवण येथील साहित्यिक तसेच निवृत्त इतिहास शिक्षिका वैशाली पंडित यांची उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमात, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक श्री डॉ. दीपक परब, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे सचिव श्री प्रसाद बागवे, मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष श्री उत्तम राणे, लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, बागवे हायस्कूल शाळा समिती अध्यक्ष सरोज परब, भरतगड देऊळवाडा
हायस्कूल क्रमांक २ चे शाळा समिती अध्यक्ष श्री. बागवे,
बागवे हायस्कूल प्रभारी मुख्याध्यापिका मसुरेकर मॅडम, भरतगड हायस्कूल क्रमांक २ देऊळवाडा शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. कांबळे आणि सर्व कमिटी सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी या प्रेरणादायी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित
रहावे असे आवाहन बागवे हायस्कूलच्या वतीने प्रभारी मुख्याध्यापिका सौ. मसुरेकर मॅडम आणि सर्व शिक्षक वर्ग यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles