‘कर्तृत्वाचा झंझावात, दातृत्वाचा अखंड झरा!, भाजपा युवा नेते विशाल परब हेच उद्याचे सर्वमान्य नेतृत्व! ; माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांचा ठाम विश्वास.

सावंतवाडी : समाजसेवा, जनसंपर्क आणि निरपेक्ष दातृत्वाच्या बळावर सर्वसामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब हे येणाऱ्या काळातील सर्वमान्य आणि सक्षम नेतृत्व म्हणून उदयास येतील, याबाबत तिळमात्र शंका नाही, असा ठाम विश्वास सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी व्यक्त केला.

भाजपा तसेच महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या पुढाकारातून सावंतवाडीतील भटवाडी शाळा क्रमांक ६ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेविका सौ. सुनिता पेडणेकर, दिलीप भालेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना बबन साळगांवकर म्हणाले, “विशाल परब यांनी राजकारणाला केवळ सत्तेचे माध्यम न मानता समाजसेवेचे प्रभावी व्यासपीठ बनवले आहे. शैक्षणिक साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण, टी-शर्ट वाटप, गरजू कुटुंबांना शिधा, आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत, वैद्यकीय सहाय्य अशा असंख्य लोकहिताच्या उपक्रमांतून त्यांनी हजारो कुटुंबांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. त्यांच्या कार्याचा विस्तार आणि लोकांप्रती असलेली बांधिलकी पाहता येणाऱ्या काळात ते निश्चितच सर्वमान्य नेतृत्व म्हणून पुढे येतील.”

ते पुढे म्हणाले की, या परिसरातील शाळांसमोरील विविध अडचणींबाबत आम्ही विशालजी परब यांच्याशी चर्चा करून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून विकासाची गंगा नेण्याची त्यांची तळमळ निश्चितच प्रेरणादायी आहे.

या कार्यक्रमास कुणाल शुंगारे, मिसबा शेख, प्रसाद कशाळीकर, नवल साटेलकर, धिरेंद्र म्हापसेकर, केतन आजगांवकर, गुरू पेडणेकर तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल परब यांच्या समाजाभिमुख कार्यामुळे ते केवळ युवा नेतृत्व म्हणून नव्हे, तर सर्वसामान्यांच्या विश्वासाचे प्रतीक बनत असल्याची भावना कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles