सावंतवाडी : माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी भाजपाला ‘राम राम’ ठोकत उद्या सायंकाळी उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश करून हाती ‘मशाल’ घेणार आहेत. सावंतवाडी विधानसभा लढवण्याची त्यांची तीव्र इच्छा असून कोणत्याही परिस्थितीत माजी आमदार राजन तेली यांनी याआधीच राज्याचे शिक्षण मंत्री केसरकर यांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर ते उद्या स्वगृही परतणार असून हाती मशाल घेऊन विधानसभेचे रणशिंग फुंकणार असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समजले आहे.
राजन तेली यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेशानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात जोरदार लढत होण्याची चिन्हे आहेत.