आज मातोश्रीवर प्रवेश ; शिंदे गटातील वरिष्ठांनी विश्वासात घेतले नसल्याचा दावा…
सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर यांच्यावर विश्वास दाखवत काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेले वेत्ये सरपंच गुणाजी गावडे पुन्हा एकदा मशाल हातात घेणार आहेत.
आज त्यांचा मातोश्रीवर ठाकरे शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
आपण शिंदे सेनेत गेलो परंतु पक्षाच्या वरिष्ठांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे आपण स्वगृही परतत आहोत, असे त्यांचे म्हणणे आहे. आज ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत.