मग तेव्हाच तक्रार का केली नाही? ; सुनेच्या आरोपांवर विनायक राऊत यांची पहिली प्रतिक्रिया.

मुंबई : ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत हिने पोलिस ठाण्यात जात विनायक राऊत, गितेश राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आणि तक्रार केली. आपल्यासोबत कसा कसा छळ झाला हे तिने तक्रारीत सांगितले. गिरीजा राऊत हिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तब्बल 7 जणांवर गुन्हा दाखल केला. शारिरिक संबंधास पती गितेश याच्याकडून नकार दिला जात असल्याचाही आरोप गिरीजा राऊतने केला. या प्रकरणावर अखेर माजी खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले. नक्की काय घडले हे त्यांनी सांगितले.

विनायक राऊत यांनी म्हटले की, कुटुंबीयावरील आरोप खोटे आहेत. गितेश यांचे लग्न झाल्यावर त्यांच्या पत्नी तीन वर्षाासून सोबत राहत नाही. 2018 ते 2022 पर्यंत अघोरी कृत्य केलं जात होते, असं त्यांनी म्हटलंय. आई-वडिलांना बाबा बुवाकडे घेऊन जाताना यायचे, असं ती म्हणते. आईबाबा सोबत होते. असे प्रकार होते तर तेव्हाच तक्रार का केली नाही. आज 2026 मध्ये ते तक्रार करतात. त्यातूनच दिसून येतंय की यामागे काळंबेरं आहे. हे प्रकार होताना आई-वडील सोबत असायचे गिरीजाने म्हटलं आहे. आई वडिलांच्या संरक्षणात असताना अघोरी प्रकारावर तक्रार का केली नाही. त्यांनी डिव्होर्सची याचिका गेल्या महिन्यात केली आहे. त्यात तडजोड करावी यासाठी दोन्ही वकिलांची बैठक झाली.

थ्री बीचएचके फ्लॅट, टेरेस फ्लॅट, पाच कोटी मागितली. इलेक्ट्रिक कार मागितली. पुन्हा डीव्होर्सची नोटीस दिली. कौटुंबीक हिंसाचाराचा उल्लेख आहे, असे विनायक राऊत यांनी म्हटले.

विनायक राऊत यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, सर्व आरोप खोटे आहेत. विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत माध्यमांसमोर आले. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. विनायक राऊत यांना यासर्व गोष्टींची कल्पना होती, असेही गिरीजा राऊतने म्हटले. विनायक राऊत यांच्या कुटुंबासोबतच दोन बाबांवर गुन्हे दाखल करण्यात आले. विनायक राऊतांच्या सूनेने केलेल्या आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles