भाजपा युवा नेते विशाल परब यांचा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढाकार! ; म्हापण परिसरातील विविध शाळांमध्ये मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप.

संदीप चव्हाण.

म्हापण : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भाजप युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून मंगळवारी म्हापण परिसरातील सहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पालक व शिक्षकांनीही या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

या उपक्रमांतर्गत केंद्रशाळा म्हापण क्रमांक १ तसेच म्हापण खालचा वाडा, मळई, पागेरे, खवणे आणि खवणेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या आणि अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. “शिक्षण हीच भविष्यातील यशाची गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची ताकद देणे म्हणजे सक्षम आणि प्रगत भारताच्या निर्मितीस हातभार लावणे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमाला म्हापण ग्रामपंचायतीच्या सरपंच आकांक्षा चव्हाण, माजी सरपंच तथा सदस्य गुरुनाथ मडवळ, उपसरपंच सुरेश ठाकूर, निकित राऊळ कोचरे, दत्ताराम कोनकर, गणेश राऊळ, ग्रामपंचायत सदस्य तन्वी चौधरी, शिया मार्गी, प्रशांती कोनकर आणि विजय ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संजोग परब, संदीप खोत, बंड्या मोंडकर, कैलास मसुरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पिंगुळकर, शिक्षिका गायकवाड मॅडम, केरकर मॅडम, सहाय्यक शिक्षक वाघमारे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक तसेच अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

विशाल परब यांच्या माध्यमातून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत असून विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक श्री. वाघमारे यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles