इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा पहिला विजय, शुभमन गिलची कामगिरी दमदार!, अक्षर-वॉशिंग्टन ठरले विजयाचे शिल्पकार, वनडे मालिकेत आघाडी.

बर्मिंघम : भारतानं इंग्लंडवर वनडे मालिकेत पहिला विजय मिळवला आहे. इंग्लंड दौऱ्यातील भारताचा हा पहिला विजय ठरला.  इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 258 धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी 259 धावांची गरज होती. भारतानं या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. शुभमन गिल आणि अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतानं पहिला विजय मिळवला. श्रेयस अय्यरनं शुभमन गिलला चांगली साथ दिली. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या 102 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं इंग्लंडला 6 विकेटनं पराभूत केलं. आता दुसरा वनडे सामना 16 जुलै रोजी होईल.

शुभमन गिलच्या सर्वाधिक धावा –

भारताच्या डावाची सुरुवात समाधानकारक झाली नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. रोहित शर्मानं  21 बॉलमध्ये 11 धावा केल्या. विराट कोहली 6 बॉलमध्ये 5 धावा करुन बाद झाला. रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांनी डाव सावरला. शुभमन गिल 80 धावांची खेळीकरुन दुखापतीमुळं मैदानाबाहेर गेला. श्रेयस अय्यर 35 धावा करुन धावबाद झाला. केएल राहुल मोठी खेळी करु शकला नाही, तो केवळ एक रन करुन बाद झाला. यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलनं भारताला विजयापर्यंत पोहोचवलं. अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. अक्षर पटेलनं यानं 57 तर वॉशिंग्टन सुंदर यानं 52 धावा केल्या.

जो रुटनं इंग्लंडचा डाव सावरला –

इंग्लडनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी 61 धावांची भागीदारी केली. त्यानंतर इंग्लंडची अवस्था 5 बाद 80 अशी होती. इंग्लंडची सहावी विकेट 107 धावांवर पडली. यानंतर जो रुट आणि लियाम डॉसम यांनी  7 व्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली.  यानंतर इंग्लंडची सातवी विकेट 228 धावांवर पडली यानंतर त्यांचा डाव 258 धावांवर आटोपला. भारतासाठी सर्वाधिक विकेट अक्षर पटेलनं घेतल्या. अक्षर पटेलनं इंग्लंडच्या चार फलंदाजांना बाद केलं. गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा यांनी दोन दोन विकेट घेतल्या. तर, शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराहनं एक एक विकेट घेतली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles