सावंतवाडीत दुचाकीचा जोरदार अपघात! ; जखमी दुचाकीस्वारासाठी देवदूत ठरले वेत्ये सरपंच गुणाजी गावडे

सावंतवाडी : सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील सर्वोदयनगर येथे आज भरधाव दुचाकीचा जोरदार अपघात झाला. या अपघातात चराठा येथील दुचाकीस्वार युवक दिनेश जाधव  जखमी झाले. अपघातानंतर काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली.

याचवेळी त्याच मार्गाने दुचाकीवरून प्रवास करणारे वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांनी अपघाताचे भीषण दृश्य पाहताच क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. जखमीला धीर देत त्यांनी स्थानिकांच्या मदतीने तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि स्वतः पुढाकार घेऊन जखमी श्री. जाधव यांना सावंतवाडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान घटनास्थळी सावंतवाडी येथील सह. पोलीस उपनिरीक्षक सुमित पीरणकर दाखल झाले व त्यांनी घटनेची गंभीर दखल घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सभापती मंगेश तळववणेकर  माहिती अधिकार पदाधिकारी सुशील चौगुले, सुमेध गावडे, सामाजिक कार्यकर्ते तथा महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी धाव घेत परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली.

सरपंच गुणाजी गावडे यांच्या तत्परता, मानवतावादी भूमिके आणि समयसूचकतेमुळे जखमीला वेळेत उपचार मिळू शकले. त्यांच्या या संवेदनशील कृतीचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत असून, “‘अपघातग्रस्तासाठी सरपंचच ठरले देवदूत!’ अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles