आंबा-काजू पिक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून १ कोटी ९० लाख व्याज सवलत जमा! ; अध्यक्ष मनिष दळवी यांची माहिती.

सिंधुदुर्गनगरी: बँकेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २% प्रमाणे व्याजाची रू.१कोटी ९०लाख एवढी रक्कम शेतकऱ्यांना शेती हंगामामध्ये प्राप्त झाल्याने काही अंशी शेतीच्या कामास मदत होईल अशी अपेक्षा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केली आहे.
सन २०२५-२६ या वर्षात अवकाळी पाऊस, वादळ, धुके, खार व दव पडणे इत्यादी हवामानातील बदलामुळे आंबा व काजू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले होते. बागायतदार शेतकऱ्यांनी बागायतीसाठी केलेला उत्पादन खर्चसुद्धा वसूल न झाल्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होत होता.

या पार्श्वभूमीवर, जिल्हा बँकेमार्फत विकास संस्था तसेच थेट स्वरूपात पिककर्ज वाटप केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्या कर्जासाठी लागू असलेल्या कर्ज व्याजदरामध्ये २% प्रमाणे व्याज रिबेट देण्याचा निर्णय बँकेने घेतला होता.

त्यानुसार दि. ३०/०६/२०२६ अखेर नियमित परतफेड केलेल्या ७३१० सभासदांना एकूण रु. १कोटी ९०लाख रक्कम त्यांच्या सेव्हिंग खाती जमा करण्यात आलेली आहे. सदरची आर्थिक मदत बँकेने आपल्या नफ्यातून दिलेली आहे.

बँकेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २% व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना शेती हंगामामध्ये प्राप्त झाल्याने काही अंशी शेतीच्या कामास मदत होईल अशी अपेक्षा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles