आ. दीपक केसरकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव! ; कुटुंबासह नेते मंडळींनी दिल्या भरभरून शुभेच्छा!

सावंतवाडी : महाराष्ट्राचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात मतदारसंघात साजरा झाला. कुटुंबियांकडून देखील मुंबई येथे केक कापून जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. राज्यातील राजकीय नेतेमंडळीडूनही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, आमदार निलेश राणे आदींसह राज्यातील नेतेमंडळीकडून श्री. केसरकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच कुटुंबियांकडून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पत्नी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, कन्या सोनाली केसरकर-वगळ, जावई सिद्धार्थ वगळ, नातू अर्जून आदी कुटुंबिय उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles