डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना मातृशोक! ; सुभद्रा ऐवळे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन.

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या मातोश्री सुभद्रा अर्जुन ऐवळे यांचे अल्पशा आजाराने छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे. निधनासमयी त्यांचे वय ८६ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
​सुभद्रा ऐवळे यांच्या निधनाने ऐवळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. स्व. सुभद्रा अर्जुन ऐवळे यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles