सावंतवाडी : मुंबई विद्यापीठ लोकनृत्य स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालयास तृतीय क्रमांक (कांस्य पदक) प्राप्त मुंबई विद्यापीठ, विद्यार्थी विकास कक्ष अंतर्गत आयोजित, युवा महोत्सव 2024-25 सप्टेंबरमध्ये मुंबई विद्यापीठ येथे झालेल्या अंतिम फेरी स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातील एकूण 57 संघांनी भाग घेतला होता. या लोकनृत्य स्पर्धेमध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक (कांस्य पदक) मिळवले.
या लोकनृत्य स्पर्धेत वैभवी दिलीप कालेलकर, समर्थ संतोष गवंडी, रेणुका शंकर राऊळ, वैभव विशाल पालव, हर्षद रामकृष्ण तळवणेकर, आत्माराम भिकाजी कवठणकर, प्राची प्रकाश करमळकर, वैष्णवी काशिनाथ गावडे, दूर्वा संजय परब, भार्गवी गोविंद पांगम या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या सर्व विद्यार्थ्यांना कला सांस्कृतिक विभागातील समन्वयक डॉ. डी. जी बोर्डे, सदस्य डॉ. एस. एम. बुवा, डॉ. एस. के. देशमुख, प्रा. आर. के. शेवाळे, प्रा. हर्षदा परब यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजे साहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, चेअरमन राणीसाहेब सौ. शुभदादेवी खेमसावंत भोंसले, मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. सतीश सावंत, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.