मुंबईत मविआचा अनपेक्षित डाव? ; वर्सोवा किंवा गोरेगाव विधानसभा मतदारसंघात ‘हा’ दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवणार?

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी आमदार आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांनी प्रवेश केला आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता कपिल पाटील यांना गोरेगाव विधानसभा मिळण्याची शक्यता आहे.

शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी जनता दलाला रामराम केल्यानंतर आणि समाजवादी गणराज्य पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली होती. मात्र, आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

काय म्हणाले कपिल पाटील?

आज आम्ही काँग्रेस पक्षात समाजवादी गणराज्य पक्ष विलीन केला असल्याचे कपिल पाटील म्हणाले. आज खर्गेंच्या निवासस्थानी माझ्या गळ्यात शाल घातली आहे. फॅसिझम विरुद्ध लढायचे आहे. फॅसिझम विरोधात राहुल गांधी लढत आहेत. आम्ही बिनशर्त काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. फॅसिझम विरोधात लढायचं हीच अट आहे. देशात संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधींनी प्रदीर्घ लढा दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles