…अन्यथा सिलिंडर मिळणे कठीण ! ; ‘एलपीजी’शी जोडलेले हे काम त्वरीत पूर्ण करा.

मुंबई : जर तुम्ही एलपीजी सिलिंडर वापरत असाल तर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक मॅसेज आला असेल. ज्यात e-KYC पूर्ण करण्याचा अलर्ट दिलेला असेल. ऑईल मार्केटिंग कंपनीच्या वतीने पाठवलेल्या या एसएमएसमध्ये एलपीजी युजर्सला हे आवश्यक काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी १६ ऑगस्टची डेडलाईन निश्चित केलेली आहे. त्यामुळे जर ही लास्ट तारीख मिस झाली तर मग तुम्हाला एलपीजी सिलिंडर मिळण्यात अडचण येऊ शकते. तसेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना देखील सरकारी सबसिडी मिळण्यात अडचण येऊ शकते.

LPG e-KYC Rule : एलपीजीशी जोडलेले हे काम त्वरीत पूर्ण करा, अन्यथा सिलिंडर मिळणे कठीण !

दिलासादायक सुरुवात..

ऑगस्ट महिन्याची सुरुवात एलपीजी ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी १ ऑगस्ट २०२६ पासून १९ किलोग्रॅमवाल्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल झालेला नाही. यासोबत कंपन्यांनी अलर्ट देखील जारी केला आहे की सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरु रहाण्यासाठी लवकरात लवकर ई-केवायसी करावी. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीवर नजर टाकली तर दिल्ली सिलिंडरची किंमत ९४२ रुपये आहे. तर कोलकातात घरगुती सिलिंडरची किंमत ९६८ रुपये आहे. तर मुंबईत ९४१ तर चेन्नईत ९५७.५० रुपये सिलिंडरची किंमत आहे.

 

SMS अलर्ट –

घरगुती एलपीजी ग्राहकांनी १६ ऑगस्टपर्यंत आधार बेस्ड ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण गरजेचे आहे. आणि यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील घरगुती एलपीजी ग्राहकांना एसएमएस अलर्ट पाठवणे सुरु केला. त्यात जर दिलेल्या मुदतीत केवायसी प्रक्रिया पूर्ण न केली तर सवलतीच्या दरात घरगुती सिलिंडर खरेदी करण्यात अडचणी येतील.

पंतप्रधान उज्ज्वला योजना ( PMUY ) च्या लाभार्थ्यांना देखील दिलेल्या मुदतीत LPG e-KYC पूर्ण करणे गरजेचे आहे. साल २०१६ मध्ये सुरु झालेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत देशात आतापर्यंत १० कोटीहून अधिक लाभार्थी आहेत. त्याअंतर्गत त्यांना दरवर्षी चार एलपीजी सिलिंडरच्या रिफिलवर ३०० रुपयांचा डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्सफर मिळतो. या आधी ९ सबसिडीवाले सिलिंडर मिळत होते. मात्र, जून पासून नियम बदलण्यात येऊन आता चार सिलिंडरची सबसिडी मिळते.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles