…अन् अख्ख्या कुटुंबाने संपवले जीवन. ; सोडियम नायट्रेडचा धूर घेतल्याचा पोलिसांना संशय.

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरामध्ये एक अत्यंत वेदनादायक घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिकरित्या जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या त्रिकोणी कुटुंबातील विनोद पिल्ले या कर्त्या पुरुषाने जीवन संपवण्याआधी लिहिलेल्या चिट्टीत आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये असे म्हटले होते. काल विनोद पिल्ले यांचा मृत्यू झाला तर आज त्यांची पत्नी सिरजा पिल्ले यांचा आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांनी सोडियम नायट्रेटसारख्या एखाद्या विषारी औषधाचा धूर घेऊन जीवन संपवल्याचा पोलिसांना संशय आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील मोरवाडी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत पती-पत्नी आणि मुलगी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विनोद पिल्ले ( 50 ) , सिरजा पिल्ले (45), आणि पौर्णिमा पिल्ले (19) अशा त्रिकोणी कुटुंबाने आर्थिक विवंचनेतून जीवन संपवल्याचे म्हटले जात आहे. या दुर्दैवी घटनेत पहिल्या दिवशी घरातील कर्ते विनोद पिल्ले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर उपचारदरम्यान आज पत्नी सिरजा पिल्ले आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले यांचाही मृत्यू झाला आहे.

आयआयएम अहमदाबाद येथून शिक्षण –

विनोद पिल्ले यांनी आयआयएम अहमदाबाद येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण घेतलेले होते.  त्यांची पत्नी नामांकित शाळेत कोऑर्डिनेटर होती आणि मुलगी कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होती. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे जीवन संपवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

1 ऑगस्ट रोजी या विनोद पिल्ले यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला होता. तर सिरजा पिल्ले आणि पौर्णिमा पिल्ले हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, काल उपचारादरम्यान सिराज पिल्ले आणि पौर्णिमा पिल्ले यांचा देखील मृत्यू झाल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या तिघांनी विषारी औषधाचा धूर घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय संत तुकाराम नगर पोलिसांना संशय आहे. आत्महत्या करण्यापूर्वी विनोद पिल्ले यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असे त्यांनी लिहून ठेवले आहे.

विनोद पिल्ले हे 2024 पर्यंत एका नामांकित कंपनीत कामाला होते. विनोद पिल्ले यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद पिल्ले हे आपल्या मित्रांना सांगत असत की ते वर्क फ्रॉम होमचे काम करीत आहेत.तर त्यांची पत्नी सिरजा पिल्ले ही मोरवाडी येथील नामांकित एका इंग्रजी शाळेत समन्वयकाचे काम करीत होती आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले ही पिंपरी चिंचवड शहरातील एका नामांकित महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होती.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles