शाळा दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य द्या! ; जि.प. सदस्य विक्रांत सावंत यांनी सभापती प्रितेश राऊळ यांचे वेधले लक्ष!, स्वनिधीतून विविध शाळांच्या दुरुस्तीची मागणी.

सावंतवाडी : जिल्हा परिषद स्वनिधीतून सावंतवाडी तालुक्यातील शाळा व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीची कामे तातडीने मंजूर करून प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांचे लक्ष वेधले.

जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक शाळांच्या इमारती, छप्पर, स्लॅब, दरवाजे-खिडक्या तसेच शौचालयांच्या दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित व शैक्षणिकदृष्ट्या पोषक वातावरण मिळण्यासाठी या कामांना विलंब न करता मंजुरी देण्याची गरज असल्याचे सावंत यांनी निदर्शनास आणून दिले.

यामध्ये माजगाव हरसावंतवाडा जि.प. शाळा क्र. ३ येथील छप्पर तसेच खिडक्या-दरवाजे दुरुस्ती, माजगाव नाईकवाडा महापुरुष विद्यामंदिर येथील लाईट फिटिंग, दरवाजे व खिडक्या दुरुस्ती, चराठे वझरवाडी जि.प. शाळेतील शौचालय बांधकाम व दुरुस्ती, तसेच ओटवणे जि.प. शाळा क्र. ३ गवळीवाडी येथील शाळा दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे.

तसेच माजगाव आरोग्यवर्धिनी केंद्रातील स्नानगृह, शौचालय, दरवाजा व खिडक्या दुरुस्ती, ओटवणे जि.प. शाळा क्र. ४, सोनुर्ली जि.प. शाळा क्र. २, सरमळे देऊळवाडी क्र. १ जि.प. शाळा, माजगाव जि.प. शाळा क्र. २ इमारतीचा स्लॅब आणि ओटवणे जि.प. शाळा क्र. २ मांडवफातरवाडी येथील छप्पर दुरुस्तीच्या कामांकडेही त्यांनी सभापतींचे लक्ष वेधले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन शाळांच्या दुरुस्तीची कामे तातडीने मार्गी लावावीत आणि जिल्हा परिषद स्वनिधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी विक्रांत सावंत यांनी केली आहे. त्यामुळे संबंधित शाळांच्या दुरुस्तीला आता मंजुरी मिळते का, याकडे पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles