वाहनांसाठी धोक्याची घंटा? मारुती, टाटा, महिंद्राच्या चाचणीत आढळलं काय? ; E20 पेट्रोलवर मोठा खुलासा.

मुंबई : E20 पेट्रोलवरून देशात वाहनधारकांमध्ये मोठी नाराजी आहे. वाहनांचे मायलेज आणि इंजिनवर त्याचा मोठा परिणाम होत असल्याची देशभर ओरड सुरू आहे. ई20 इंधनाचा परिणाम दुचाकी, चारचाकीच्या कार्यक्षमेतवर होत असल्याचा संताप समोर येत आहे. त्याचवेळी एक अहवालाने अनेकांची झोप उडवली आहे. त्यात प्रदूषण कमी होण्याचे, पेट्रोल स्वस्त होण्याचे सरकारचे दावे पार खोडून काढले आहेत. विशेष म्हणजे आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांनीच मोहिम हाती घेत चाचणी केली असता धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

‘त्या’ चाचणीत आढळले काय?

E20 पेट्रोलविषयी देशात मोठी ओरड सुरू आहे. त्यातच रॉयटर्सच्या एका वृत्तानुसार, मारुती, टाटा आणि महिंद्रा या आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी देशातील 21 राज्यांमधून E20 पेट्रोलचे 250 नमुने तपासले. यापैकी 18 राज्यांमधील पेट्रोलमधील क्लोराईडचे प्रमाण हे निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे वाहन खराब होत असल्याच्या दाव्याला बळकटी मिळाली आहे. वाहनाच्या लोखंडी भागावर त्याचा थेट परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याने वाहनधारकांची चिंता वाढली आहे.

क्लोराईडचे प्रमाण कित्येक पटीने अधिक

क्लोराईडसाठी 3 PPM हे निर्धारीत मानक आहे. पण या चाचणीनुसार, महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्ली, नोएडा मध्ये हे प्रमाण मर्यादेपेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे. रॉयटर्सने हे वृत्त संबंधित कंपन्यांमधील अंतर्गत ई-मेलच्या आधारे तयार केल्याचा दावा करण्यात येत आहे. कंपनी अधिकाऱ्यानुसार, 1 PPM पेक्षा जास्त क्लोराईडचे प्रमाण वाहनांसाठी नुकसानदायक ठरू शकते. याअगोदर पुरेशा प्रमाणात चाचण्या न घेतल्याने ऑटोमोबाईल कंपन्यांची संघटना SIAM ने ई 20 पेट्रोलवर सवाल विचारणारा अहवाल मागे घेतला होता. त्या आधारे केंद्र सरकारने 2000 पेक्षा अधिक नमुन्यांपैकी केवळ 2 ते 4 नमुन्यावर परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला होता. आता जर ऑटोमोबाईल कंपन्यांमधील अंतर्गत ई-मेल आधारे रॉयटर्स वृत्तसंस्थेचा दावा खरा असेल तर वाहनधारकांची चिंता वाढणार आहे.

क्लोराईड अधिक असल्यास वाहनावर काय परिणाम?

E20 पेट्रोलमध्ये 20 पर्यंत इथेनॉल असते. क्लोराईड अधिक असेल तर इंधनाच्या संपर्कातील धातुचा भागाला गंज लागण्याची भीती आहे. यामुळे इंधन पंपाच्या कार्यक्षमतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. फिल्टरमध्ये अडचण येऊ शकते. इंधनाच्या मार्गातील काही घटकांची झीज होऊ शकते. महागडी वाहन लवकरच दुरुस्तीस येऊ शकतात. वारंवार सर्व्हिसिंग करावी लागू शकते. काही भाग बदलावे लागू शकतात. पर्यायाने वाहनधारकावर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडू शकतो.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles