आंबोली नांगरतास येथे भीषण अपघात, दोघे जखमी. ; पत्रकार भरत केसरकर यांचे बंधू केशव केसरकर जखमी तर संतोष धुरी यांना गंभीर दुखापत.

आंबोली : आंबोली नांगरतास येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रक आणि व्हॅगनार कार मध्ये धडक देऊन झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. या अपघातात केशव दत्ताराम केसरकर (वय २७) आणि संतोष रामचंद्र धुरी (वय ३२), दोघेही रा. माणगाव कट्टावाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग हे जखमी झाले आहेत. संतोष धुरी यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

या अपघातातील जखमी केशव केसरकर हे पत्रकार भरत केसरकर यांचे भाऊ असल्याचे समजते.

उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार –

अपघातानंतर दोन्ही जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. विशाल रेड्डी तसेच ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. निखिल अवधूत यांनी जखमींची तपासणी करून प्राथमिक उपचार केले. त्यांना आवश्यक औषधोपचार व इंजेक्शन देण्यात आले.

राजू मसुरकर यांची तत्पर मदत –

या घटनेनंतर जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर हे जखमी रुग्णांसोबत उपस्थित होते. त्यांनी उपचारादरम्यान आवश्यक मदत व सहकार्य केले. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतची अधिक माहिती संबंधित यंत्रणेकडून तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles