संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले व राजघराण्याकडून शुभेच्छा! नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले व युवराज लखमराजे भोंसले यांची सदिच्छा भेट! ; संजू परब यांच्या पुढील वाटचालीस दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सावंतवाडी : सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा विद्यमान नगरसेवक सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले व राजघराण्याकडूनही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले व सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांनी संजू परब यांची सदिच्छा भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सामाजिक, राजकीय व सार्वजनिक जीवनातील पुढील वाटचालीस यश, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्यासाठी राजघराण्याच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

संजू परब यांच्या कार्यशैलीतील धडाडी, जनसंपर्क, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी असलेली तत्परता यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध स्तरांतील नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सावंतवाडीच्या राजकीय-सामाजिक वर्तुळात त्यांच्या वाढदिवसाची विशेष चर्चा रंगली आहे.

दरम्यान, दिवसभर विविध ठिकाणी संजू परब यांचा सत्कार, सदिच्छा भेटी आणि शुभेच्छांचा सिलसिला सुरू असून ‘संजू परब’ या नावाभोवतीचा आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा गोतावळा त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles