मोती तलावात युवक-युवतीची उडी. ; युवकाचा मृतदेह हाती, युवतीचा शोध सुरू!

सावंतवाडी : शहरातील मोती तलावात युवक आणि एका युवतीने उडी घेतल्याची धक्कादायक घटना आज घडली. या घटनेत युवकाचा मृतदेह सापडला असून, युवतीनेही तलावात उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. घटनास्थळी युवकाचे दप्तर, मोबाईल, इयरबड आणि वॉलेट आढळून आले आहेत.

युवकाचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला असून, युवतीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेची माहिती शहरात पसरताच मोती तलाव परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली.

दरम्यान, दोघांनी नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles