वेंगुर्ला : एकता महिला प्रभाग संघ, तुळसची सन २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्सव मंगल कार्यालय, तुळस येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेला तब्बल ९५० महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकता महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा माधवी मोरेश्वर गावडे होत्या. सचिव दामिनी दिलीप बर्डे व कोषाध्यक्षा सीमा संतोष परब यांच्यासह व्यासपीठावर पंचायत समिती सभापती श्री. शंकर घारे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता पडवळ, तुळस गावच्या सरपंच सौ. रश्मी परब, उपसरपंच श्री. नारायण कुंभार, होडावडा सरपंच सौ. रसिका केळुस्कर, वजराट सरपंच सौ. अनन्या पुराणिक, मातोंड सरपंच सौ. मयुरी वडाचेपाटकर, पाल सरपंच सौ. कावेरी गावडे, पाल उपसरपंच सौ. प्रीती गावडे, तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, तालुका अभियान व्यवस्थापक श्री. कावले, तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन श्री. सागर आवळेगावकर, प्रभाग समन्वयक म्हापण सौ. रेखा परुळेकर, रेडी प्रभाग समन्वयक सौ. प्राजक्ता नाईक, झेप महिला प्रभाग संघ, उभादांडा अध्यक्षा सौ. उर्वी गावडे, त्रिवेणी महिला प्रभाग संघ, रेडीचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समिती सभापती श्री. शंकर घारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता पडवळ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती श्री. शंकर घारे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता पडवळ यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध संधी, महिला सक्षमीकरण, बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन तसेच महिलांनी सामाजिक व विकासात्मक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मागील इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले तसेच आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. प्रभाग संघाच्या विविध उपक्रमांचा व आगामी नियोजनाचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
विशेष म्हणजे, धान संस्थेमार्फत सभास्थळी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या माध्यमातून सभेसाठी उपस्थित झालेल्या महिलांचे विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे महिला सक्षमीकरणासोबतच त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीनेही या उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गायत्री धोंड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग संघ व्यवस्थापक तनुजा परब, प्रभाग संघ लिपिका प्रतिज्ञा गावडे, प्रभाग समन्वयक सायली आंगचेकर, सर्व सीआरपी ताई, ग्राम संघ पदाधिकारी, ग्राम संघ लिपिका, समूह सदस्य व समूह पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
एकूणच, महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग, मान्यवरांचे मार्गदर्शन, आर्थिक नियोजनाचा आढावा आणि महिलांच्या विमा संरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेला विशेष कॅम्प यामुळे एकता महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली.



