‘या’ तीन लोकांचा कधीच विश्वासघात करू नका! ; चाणक्य काय सांगतात?

‘चाणक्य नीती’

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी ‘चाणक्य नीती’ नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात.

चाणक्य म्हणतात माणसाचं आयुष्य हे अनेक चढ-उताराने भरलेलं असतं. आयुष्यात कधी सुख येत, कधी दु:ख असतं. माणसाने स्थिर राहायला शिकलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुमच्या आयुष्यात सुख येते, तेव्हा त्या गोष्टींचा आनंद घ्या, परंतु त्यामध्ये वावहत जाता कामा नये, तसेच दु:खाचं देखील आहे, समजा तुमच्या आयुष्यात एखादा दु:खाचा प्रसंग आला तर त्यामुळे खचून जाऊ नका, जिद्दीने प्रयत्न करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्की यश मिळेल. परंतु त्याचबरोबर चाणक्य आणखी एक असा सल्ला देखील देतात, चाणक्य म्हणतात तुमच्या वाईट काळात जो तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला आहे, त्याला कधीही धोका देऊ नका!

चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? 

वाईट काळात साथ देणारा मित्र- चाणक्य म्हणतात जो मित्र तुमच्या वाईट काळात खंबीरपणे तुमच्यासोबत उभा राहिला आहे, त्याच्यासोबत कधीही विश्वासघात करू नका, तुम्ही जर अशा व्यक्तीसोबत विश्वासघात केला तर त्याची फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल. तुम्हाला आयुष्यभर त्याचा पश्चताप राहील, त्यामुळे अशा व्यक्तीसोबत कधीही विश्वासघात करू नका.

पत्नी – चाणक्य म्हणतात माणसाने आपल्या पत्नीसोबत नेहमी प्रामाणिक असलं पाहिजे, तरच तुमचा संसार सुरळीत होऊ शकतो. तुम्ही कधीही तुमच्या पत्नीचा विश्वासघात करू नका.

अडचणीत मदत करणारा माणूस – चाणक्य म्हणतात जे माणूस आपल्या संकट काळात आपल्या मदतीसाठी धावून आला, त्या माणसासोबत कधीही विश्वासघात करू नका, अशा माणसांना नेहमी मदत करा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles