ठाणे : राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे यंदाच्या या निवडणुकीत अटीतटीची लढत होणार असल्याचं चित्र आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई आणि ठाण्यात कुणाला उमेदवारी दिली जाणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने कंबर कसली आहे. शिंदेच्या कोपरी पचपाखाडी विधान सभा क्षेत्रात ठाकरे गट एका मोठ्या नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. आनंद दिघे यांचे पुतणे, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांना ठाकरे गट उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गटाचा तगडा उमेदवार, आनंद दिघेंच्या कुटुंबातील ‘या’ व्यक्तीला तिकीट मिळणार ; ठाण्यात मोठा डाव.
0
42