✍️रूपेश पाटील.
सावंतवाडी : सध्या सोशल मीडियाच्या दुनियेत ‘बॅक टू ८०’s’ या भन्नाट ट्रेंडची जोरदार हवा पाहायला मिळत आहे. ८०च्या दशकातील फॅशन, हेअरस्टाईल, पोशाख आणि त्या काळातील खास वातावरणाची आठवण करून देणारे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या ट्रेंडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. आता या ट्रेंडमध्ये भाजपचे युवा नेते विशाल परब यांनीही एन्ट्री घेत आपल्या हटके अंदाजाने सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे.
विशाल परब यांनी ८०च्या दशकातील खास लूक आणि स्टाईलची झलक देणारा आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जुन्या काळातील फॅशनचा बाज, चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि रेट्रो वातावरणाची अनुभूती देणारा हा फोटो पाहताच नेटकऱ्यांच्या नजरा त्यावर खिळल्या आहेत. ‘जुना अंदाज, नवा जलवा’ अशीच काहीशी अनुभूती त्यांच्या या फोटोमधून पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही ‘बॅक टू ८०’s’ ट्रेंडमध्ये सहभागी होत आपले रेट्रो अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विशाल परब यांनीही या ट्रेंडमध्ये सहभागी होत आपल्या चाहत्यांना आणि सोशल मीडिया फॉलोअर्सना एक वेगळाच ‘रेट्रो सरप्राईज’ दिला आहे.
विशाल परब यांच्या या फोटोमध्ये ८०च्या दशकातील स्टाईलचा ठसा स्पष्टपणे जाणवतो. त्या काळातील फॅशन आणि आजच्या सोशल मीडिया ट्रेंडचा सुरेख मेळ साधत त्यांनी हा फोटो सादर केला आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाबरोबरच सोशल मीडिया विश्वातही त्यांच्या या ‘रेट्रो लूक’ची चर्चा रंगताना दिसत आहे.
राजकारणातील घडामोडींवर सक्रिय असणारे विशाल परब सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असल्याचे वेळोवेळी दिसून येते. विविध सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक उपक्रमांमधील सहभागासोबतच सोशल मीडियावरील त्यांच्या वेगळ्या अंदाजामुळे ते तरुणाईमध्ये चर्चेत असतात. आता ‘बॅक टू ८०’s’च्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा आपल्या हटके स्टाईलची झलक दाखवून दिली आहे.
८०च्या दशकातील रेट्रो अंदाज आणि आजच्या डिजिटल दुनियेचा संगम घडवणारा विशाल परब यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच भाव खाऊन जात असून, ‘विशाल परब यांचा ८०’s लूक भन्नाट!’ अशीच प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटताना दिसत आहे.



