आमदार निलेश राणे यांच्या दीर्घायुष्य व मंत्री पदासाठी गुरू मठकर यांच्याकडून चांदीच्या गणेशमूर्तीवर अभिषेक!

कुडाळ : अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त कुडाळ येथील दैवज्ञ गणपती मंदिरात भक्तिभावाने धार्मिक विधी पार पडले. यावेळी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या नावाने चांदीच्या श्री गणेशमूर्तीवर विधिवत अभिषेक करण्यात आला.

श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत, निलेश राणे यांना दीर्घायुष्य लाभावे, उत्तम आरोग्य लाभावे, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, तसेच त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीला यशाची नवी शिखरे गाठता यावीत, अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.

यावेळी आगामी गणेश चतुर्थीपूर्वी निलेश राणे यांना मंत्रिपदाचा मान मिळावा, अशी विशेष प्रार्थनाही श्री गणरायाच्या चरणी करण्यात आली. कोकणच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या राणे कुटुंबीयांना बळ, ऊर्जा आणि यश लाभावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यासमोर उभ्या ठाकलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा समर्थपणे सामना करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक भाई केसरकर यांना श्री गणरायाने शक्ती, धैर्य आणि सामर्थ्य प्रदान करावे, अशीही प्रार्थना करण्यात आली.

संकष्टीच्या पावन पर्वावर गणरायाच्या चरणी करण्यात आलेल्या या अभिषेकामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ‘विघ्नहर्ता गणराया, राणे कुटुंबीयांवर कृपाछाया ठेव; जनसेवेच्या कार्याला यश दे आणि कोकणाच्या विकासासाठी त्यांना अधिक सामर्थ्य दे’, अशी भावना भक्तांच्या मनातून व्यक्त झाली.

शेवटी राणे कुटुंबीयांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड यश लाभावे, तसेच सिंधुदुर्गच्या जनतेवरील संकटे दूर करून जिल्ह्याला सुख-समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना श्री दैवज्ञ गणपतीच्या चरणी करण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles