Wednesday, May 21, 2025

Buy now

spot_img

महायुती सरकारच्या माध्यमातून राबविलेल्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत घेऊन जा.! ; खा. नारायण राणे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही मतदारसंघात भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद.

सावंतवाडी : महायुती सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने राबविलेल्या लोककल्याणकारी योजना केलेले विधायक कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत तसेच मतदारांपर्यंत पोहोचविणे हे तुमचे काम आहे. जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी व्हायला हवेत यासाठी कामाला लागा, अशा सूचना माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी तिन्ही मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेतली तसेच काही सूचना केल्या. या भेटीदरम्यान सर्वच ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला. कणकवली येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भेट देत त्यांनी कार्यकर्त्यांशी हितगुज साधले. त्यानंतर ॲड. राजू परुळेकर यांच्या निवासस्थानी जात त्यांचे वडिल राजाभाऊ परुळेकर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. मिलींद कुलकर्णी उपस्थित होते.
कणकवलीनंतर कुडाळ येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला भेट देत त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना केल्या तसेच त्यांच्याशी चर्चा करीत परिस्थिती जाणून घेतली.


कुडाळ मतदार संघातील एकूणच प्रचारा संदर्भात आढावा घेतला.
सावंतवाडी मतदार संघात दुपारी त्यांनी भेट दिली. यावेळी प्रथम त्यांनी शिवसेनेचे जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. या मतदारसंघात आपल्याला किमान ५० हजारांचे मताधिक्य घ्यायचे आहे त्या दृष्टीने कामाला लागा अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. यावेळी संजू परब यांच्यासह मंदार नार्वेकर, गुरुनाथ सावंत, जावेद खतीब, विनोद सावंत, झेवियर फर्नांडीस, परिक्षीत मांजरेकर , ज्ञानेश्वर सावंत, सत्यवान बांदेकर, क्लेटस फर्नांडीस, उदय देऊलकर, नितीन गावडे, संजय वरेरकर , राज वरेरकर, सचिन साटेलकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सावंतवाडीतील भाजप कार्यालयात देखील भेट देत त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची हितगुत साधले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी त्यांचे स्वागत केले. सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम करायला हवे. मंत्री दीपक केसरकर हे जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी होण्यासाठी कामाला लागा अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या. यावेळी महेश सारंग यांच्यासह भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगांवकर, पुखराज पुरोहित, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे,माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, प्रमोद सावंत, राजू परब, चंद्रकांत जाधव, मोहीनी मडगांवकर, प्राजक्ता केळुसकर, प्रमोद गावडे, माजी नगरसेवक उदय नाईक, ॲड. परिमल नाईक, गुरुदास मठकर, संतोष गांवस, राघू चितारी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री तथा विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात देखील भेट देत खा. नारायण राणे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रचाराची एकूणच परिस्थिती याबाबत त्यांनी आढावा घेतला तसेच काही सूचना देखील केल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुकाप्रमुख बबन राणे, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शहर प्रमुख बाबु कुडतरकर, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, माजी उपनगराध्यक्षा अनारोजीन लोबो, महिला आघाडी प्रमुख ॲड. निता कविटकर, माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर, शुभांगी सुकी, भारती मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्या अंतर्गत त्यांनी शेवटी दोडामार्ग तालुक्यात भेट देत तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधत विधानसभा निवडणुकी संदर्भात विचार विनिमय केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles